श्याम बेज्जनवार
गडचिरोली
अहेरी तालुक्यातील किष्टापूर वेल येथे जय सेवा सी.सी.किष्टापूर द्वारे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.
भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामन्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत किष्टापूर वेल व मंडळ कडून देण्यात आली.
कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून हणमंतू मडावी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नरेश मडावी होते.यावेळी मंचावर पोलीस पाटील महेश अर्क,माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम गदेकर,अनिल दब्बा,ऋषी सडमेक,प्रमोद आत्राम,प्रवीण रेषे,भगवान आत्राम,चित्तूजी बिश्वास,हरिदास आत्राम,रवी मडावी,पुणेस कंदीकुरवार,संजय मडावी,निवास मडावी,आनंदराव चहकाटे,गौतम गावडे,उमेश मडावी,विनू मडावी,मोरेश आत्राम,मधुकर सडमेक,संतोष मडावी,शंकर आत्राम यांचासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक,परिसरातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







