श्याम बेज्जनवार
गडचिरोली
केंद्रस्तरीय बालक क्रीडा संमेलनात प्राथमिक गटातील विविध खेळांमध्ये जबरदस्त कामगिरी करत मेडारम शाळेने यंदाची चॅम्पियन शील्ड पटकावली. विद्यार्थ्यांनी संघभावना, जिद्द आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर सर्वांना आपली चमक दाखवली.
स्पर्धेदरम्यान मेडारम शाळेच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट लढत देत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. खेळाडूंच्या परफॉर्मन्सने शिक्षक व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मेडारम शाळेला चॅम्पियन शील्ड प्रदान करण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे साध्य झालेले हे यश संपूर्ण केंद्रासाठी अभिमानास्पद ठरले.
मेडारम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे केंद्र प्रमुख श्री.आय. जे. खान तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.







