*
मेधाश्री इंग्लिश मिडीयम स्कुल रामनजापूर टोला मध्ये १४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मेधाश्री इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याद्यापक श्री. रामकुमार अडपा हे होते, तर मंचावर
प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ शिक्षक राजकुमार कोरबोईना व शिक्षिका सौं. रजिता शेनिगारपू हे होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यपक श्री. रामकुमार अडपा यांनी सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले, देशाला आधुनिकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न केले, संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि पंचवार्षिक योजनांची स्थापना केली. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची
आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती अशा परिस्थितीमध्ये देशाला यशोशिखरावर नेण्याचं खरं श्रेय पंडित जवाहलाल नेहरू यांना जाते असेही यावेळी बोलताना मुख्याद्यापक रामकुमार अडपा म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कु.नागस्नेहा करवा यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.







