सिरोंचा तालुका मुख्यालय पासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुगापूर, मुदुकृष्णापूर , या दोन्ही गावात पेंटिपाका ग्राम पंचायत प्रशासनाकडून आबा कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आली आहे, त्या शिबिरात मुगापूर, मुदुकृष्णापूर या दोन्ही गावातील गावकरी आणि महिलांकडून उत्कृष्ट प्रतिसाद देखील मिळाली आहे, या शिबिरात मुगापूर मुदुकृष्णापूर गावात आबा कार्ड नसलेल्यानी नवीन आबा कार्ड नोंदणी करून घेतली आणि ज्यांचाकडे आबा कार्ड नोंदणी आहे त्यांनी दुरुस्ती करून घेतली आहे, आबा कार्ड नोंदणी शिबिर गावात घेतल्याने मुगापूर, मुदुकृष्णापूर गावातील गावकऱ्यांकडून ग्राम पंचायत पेंटिपाका प्रशासनाला आभार मानले आहेत,






